आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच़े व ओबीसी जातीचे आर्थिक व सामाजिक राजकीय नुकसान केले – वसंत मुंडे

परळी वैद्यनाथ ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची भाव पाडून आर्थिक लूट केली व जनगणनेतून आरक्षणासाठी ओबीसीच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांचे खरीप व रब्बीचे शेती मालाचे उत्पन्न तयार झाले की परदेशातून सर्व प्रकारचा शेतीमाल ठराविक टक्केवारी देणाऱ्या व्यापाऱ्यामार्फत मागून घेऊन टॅक्समध्ये सवलत देऊन संपूर्ण शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्याचे जीवन उध्वस्त करण्याचा केंद्रातील व राज्यातील सरकारचा अजिंठा आहे. अमेरिका ब्राझील अर्जेंटिना चीन या देशात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. भारत देशातील सोयाबीन व भाजीपाला फळे इतर पिकांमध्ये सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात करा मध्ये सवलत धोरणामुळे शेतीमालाचे भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या चिंताजनक असून संपूर्ण शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यापुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहत असल्यामुळे आत्महत्या वाढत आहेत . संपूर्ण देशातील जातनिहाय जनगणना करण्याकरिता आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध निकष दर्शवून मूल्यमापन जातनिहाय आरक्षणासाठी करणे काळाची गरज आहे. परंतु आरएसएस च्या विचारधारेचे केंद्र व राज्यातील बीजेपी सरकार संपूर्ण देशातील आरक्षण रद्द करण्याची वाटचाल करीत आहे. त्यासाठी शेतकरी व ओबीसीच्या नेत्यांनी जनतेने केंद्र व राज्यातील सरकारच्या विरोधात प्रचंड मोठे जनआंदोलन उभे करण्याची तयारी करावी. शेतकऱ्याच्या दैनंदिन कुटुंबाचा खर्च भागवणे अडचणीचे झाले आहे. शेती मधील खते बी बियाणे कीटकनाशक औषधी ट्रॅक्टर खर्च खुरपणी फवारणी मळणी यंत्र मजुरी दैनंदिन खर्च वाढल्यामुळे व शेतीमालाचे भाव पाडले, त्यामुळे शेती परवडत नाही .उत्पादनातून खर्च निघणे शक्य नाही, शासनाचे बाजारपेठेवर नियंत्रण नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्याचा शेतीमाल बाजारपेठेतून खरेदी केला जात आहे. शासनाकडून कोणतेही कारवाई नियमानुसार केली जात नाही. शासनाकडून आधारभूत किंमत शेतीमालाला मिळत नाही, बाजारपेठेवर नियंत्रण नाही. शेतकरी व ओबीसी समाजाचा कर्दनकाळ हा केंद्र व राज्य सरकार चे निष्क्रिय धोरण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!