आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तकपदी निवड

भरारी न्युज. पाचोड, छत्रपती संभाजीनगर: पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांची २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील युवकांना मार्गदर्शन मिळावे, तसेच करिअर कट्टा उपक्रमामार्फत त्यांचा सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अनुभवी व कर्तव्यनिष्ठ प्राचार्यांची नियुक्ती केली जाते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी प्राचार्य डॉ. कोठावळे यांच्या नावाची निवड केली. प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची निवड झाल्याबद्दल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर, विभागीय संचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर, विभागीय प्रवर्तक प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. राजेंद्र उढान, डॉ. राजेश लहाने, संभाजीनगर जिल्हा समन्वयक डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार, डॉ. वैशाली पेरके, डॉ. तुकाराम गावंडे, डॉ. गांधी बानायत आदी मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी करिअर कट्टा उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या भविष्यासाठी योग्य दिशा ठरवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!