आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोन्याच्या हांड्याचा बहाणा,दहा लाखाची फसवणूक, जंगली रम्मीत पैसे उडवले – भोंदूबाईला आरती गायकवाड ला अटक!

धारूर (प्रतिनिधी) – "तुमच्या घरात सोन्याच्या बिस्किटांचा हांडा आहे, तो न काढल्यास मुलाला धोका होईल!" अशा अंधश्रद्धा पसरवून कोळपिंपरी येथील एका महिलेला दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरती मनोहर गायकवाड असे या आरोपीचे नाव असून, तिने हे संपूर्ण पैसे ऑनलाईन जुगारात (जंगली रम्मी) उधळल्याचे चौकशीत उघड झाले आहे. फसवणुकीचा प्रकार: फिर्यादी महिलेच्या डोकेदुखीच्या त्रासावर उपाय म्हणून एका मजूर महिलेने तिला कोळपिंपरीतील ‘भोंदू महाराजीन बाई’कडे जाण्यास सांगितले. या बाईने घरात गुप्त सोन्याचा हांडा असल्याचे सांगून मोठे विधी करायला लावले. होम-हवन, मंत्रतंत्र, खड्डा खोदणे, शिव ओलांडू न देणे अशा विविध बहाण्यांनी या कुटुंबाकडून वेळोवेळी पैसे उकळले गेले. आरती गायकवाड हिने पाच किलो गोडतेल, नवीन कपडे, सोन्याच्या मूर्ती, गाणगापुर दर्शन, पुणे यात्रा यासाठी वेगवेगळ्या कारणांनी पैसे घेतले. बँक खात्यात ऑनलाइन व्यवहार, फोन-पे आणि आरटीजीएसद्वारे लाखो रुपये पाठवायला लावले. कुटुंबावर झाले मोठे संकट कर्जबाजारी झालेल्या कुटुंबाला नातेवाईकांचेही पैसे परत करता आले नाहीत. मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला, महिलेचा रक्तदाब वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. अखेर हा प्रकार माऊस भाऊ गणेश लगड यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास धारूर पोलिसांनी 318(4), 127(4) आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची, यावर तपास सुरू आहे. याशिवाय, या महिलेकडून इतर अनेक तरुणांची लग्नासाठी फसवणूक केल्याची माहिती समोर आली असून, अनाथाश्रमातील मुली दाखवून पैसे घेतल्याचाही संशय आहे. सामाजिक संस्थांना आवाहन या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा बळी ठरणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कार्यकर्ते आणि शासनाने अशा पीडित कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. थोडक्यात: सोन्याच्या हांड्याचा बहाणा, लाखोंची फसवणूक, जंगली रम्मीत पैसे उडवले – भोंदूबाईला अटक!

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!