आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विद्यार्थी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरण
भरारी न्युज..उत्तरेश्वर शिंदे होळ बनसारोळा येथील श्री. बनेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री. होळेश्वर विद्यालय, साठे नगर, होळ (ता. केज) येथे विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार मा. श्री. सचिन देशपांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये गट शिक्षण अधिकारी श्री. लक्ष्मणराव बेडसरकर, केंद्रप्रमुख श्री. चौरे सर होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. भागवत दादा गोरे होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी लेझीम, मानवी मनोरे उभे करत अतिथींचे स्वागत केले. आनंदनगरी या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी चविष्ट पदार्थ तयार करून विक्री केली, ज्याला पालक आणि मान्यवरांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमास प्रा. डॉ. सतीश कदम, संस्थेचे संचालक श्री. अभयसिंह भिसे, मुख्याध्यापक श्री. देवानंद मलदोडे, योगेश भैय्या शिंदे तसेच उपसरपंच बाळासाहेब घुगे व श्री. प्रकाश जाधव सर प्रा.आपेट सर आदी मान्यवर उपस्थित होते. बालासाहेब खोगरे सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर आभार प्रा.भैय्यासाहेब सरवदे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी आयोजित या स्नेहसंमेलनात विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माता-पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले




