आपला जिल्हाताज्या घडामोडी

मोरेवाडीत एकतर्फी प्रेमातून गोळीबार; आरोपीला पोलिसांनी चार तासांत केले अटक

अंबाजोगाई.भरारी न्युज. आज सकाळी नऊ ते दहा दरम्यान मोरेवाडी येथील माऊली नगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या घरावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी गणेश पंडित चव्हाण (वय 24, रा. गोविंद नगर, रेणापूर, जि. लातूर) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार तासांत आरोपीला ज्वारीच्या शेतात लपून बसलेल्या अवस्थेत अटक केली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झाले वाद गणेश चव्हाण याचे तीन वर्षांपासून संबंधित तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, सतत त्रास देत असल्याने तरुणीने 23 ऑगस्टपासून त्याच्याशी बोलणे बंद केले. या कारणावरून गणेश तिला वारंवार धमक्या देत होता. आज सकाळी गणेश स्कूटीवरून माऊली नगरमधील तरुणीच्या घरी आला. त्याने पिस्तुल काढून घराच्या दरवाजावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भीतीपोटी तरुणीची आई आणि भाऊ घरात लपून बसले. गणेशने दरवाज्याबाहेरून धमकावत गोळीबार केला. गोळी खिडकीच्या काचेतून घरात घुसली, परंतु सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी गणेश चव्हाण रेणापूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकांनी रेणापूरमधील ज्वारीच्या शेतात आरोपीचा शोध घेतला. चार तासांच्या प्रयत्नांनंतर गणेश लपून बसलेला सापडला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांचा वेगवान तपास या कारवाईत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, एपीआय ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस कर्मचारी रवी कुमार पवार, महादेव आवळे, हनुमंत लाड, पांडुरंग काळे यांनी सहभाग घेतला. संबंधित आरोपीविरोधात प्राणघातक हल्ला, धमकी, शस्त्रास्त्र बाळगणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!