आपला जिल्हामहाराष्ट्र
अंबाजोगाई डिजिटल मिडिया पत्रकार संघा कडून माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अंबाजोगाई : माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अंबाजोगाई डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी समाजातील विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ‘भरारी न्यूज’चे संपादक तथा डिलिट मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तरेश्वर शिंदे, तसेच दिल्ली क्लासेसचे संचालक, एडवोकेट अजमेर शेख, उपाध्यक्ष, डिजिटल मीडिया पत्रकार संघ, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. माता रमाई यांच्या महान कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या त्यागमय जीवनाचे महत्त्व पटवून दिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीमध्ये रमाई यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत त्यांच्या त्याग व समर्पणाची आठवण करून दिली. कार्यक्रमात सामाजिक न्याय, महिलांचे हक्क आणि शिक्षण यावर भर देत माता रमाईंच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
