आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसंपादकीय

जनतेला जनतेतला आमदार हवा”; नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाला विरोध. पाच वर्षे जनतेत असणारा आमदार पाहिजे पुणे मुंबई मध्ये राहणारा नकोय सासरा काम पाहणारा तर नकोच आहे.

केज. प्रतिनिधी. भाजपच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सध्या असंतोषाची भावना दिसून येत आहे, आणि अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून दूर जात आहेत. काही नेते पक्षात राहून महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचे समर्थन करत आहेत. याचा परिणाम म्हणून केज तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि मुंदडा परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद वाढत आहेत. हारुन भाई इनामदार यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी, आपल्या समर्थकांसह महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत असंतोषाचा मुद्दा जनतेच्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः मुंदडा परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधील तुटलेपण या असंतोषाचे कारण बनले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, मुंदडा परिवाराचे काही निकटवर्तीयच कार्यकर्त्यांना परिवाराच्या सदस्यांशी संवाद साधू देत नाहीत. त्यामुळे गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मुंदडा परिवाराने काम केले असले तरी जनतेत प्रत्यक्ष आमदार दिसलेच नाहीत, एकदा निवडून आले की परत कधीही जनतेत दिसत नसल्याने मतदार संघातील जनता नमिता यांच्यावर नाराज आहे त्यांचे सासरे आमदार म्हणून मिरवताना जनतेत दिसल्याने जनता अशा मिरवणाऱ्या सासऱ्यांवर नाराज असल्याने नमित मुंदडा आमदार यांना येत्या विधानसभेला घरीच बसावं लागणार आहे, आमदारांच्या सासर्‍यांचा घमंडीपणा पाहून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनात उतरले आहेत. अमदार नमिता मुंदडा यांनी गेल्या पाच वर्षांत पुणे-मुंबईमध्ये राहून काम केले आहे, पण स्थानिक पातळीवर त्यांचा संपर्क कमी झाला आहे. मतदारांना वाटते की त्यांना एक असा आमदार पाहिजे आहे जो त्यांच्या दररोजच्या समस्यांमध्ये सहभागी होईल. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे, आणि आगामी निवडणुकीत मुंदडा यांना घरी बसवण्याचा निर्धार जनतेने घेतला आहे, अशी चर्चा ठळकपणे ऐकायला मिळत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, नमिता मुंदडा यांचा पराभव निश्चित वाटत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!