आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

अंबाजोगाई शहरांमध्ये चौका चौकातल्या टपरीवर खुलेआम गुटखा विक्री

भरारी न्युज अंबाजोगाई उत्तरेश्वर शिंदे अंबाजोगाई तालुक्यात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे. परंतु, कारवाई केली जात नाही. या खुलेआम गुटखा विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची ‘नजर’ मेल्याने गुटख्याचे अवैध विक्री चालू च आहे.जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. कि गुटखा बंद असताना हा गुटखा अंबाजोगाई शहरांमध्ये येतो कुठून आणि कोणाच्या आशीर्वादाने चौका चौकातल्या टपरीवर वितरित केला जातो ? तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते. तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे. तरीही अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नये म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती. परंतु, त्यानंतरही अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. पण,अंबाजोगाई शहरामधल्या एकाही टपरीवर प्रशासन कारवाई करीत नसल्याचेही दिसून येत आहे त्यामुळेच सर्व चौकातील टपरी चालक खुलेआम गुटखा विक्री करताना दिसत आहेत अंबाजोगाई शहरात विविध भागांत वितरण कसा गुटखा केला जातो? कोणत्या व्यवसायाच्या माध्यमातून हा गुटखा विक्रेत्यांकडे पोहोचवला जातो ? गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा पिढी गारद होत आहे.ही मोठी सामाजिक हानी आहे. याकडे अन्नऔषधे प्रशासन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे म्हणूनच अंबाजोगाई शहरातील प्रत्येक चौकातील टपरीवर सर्व प्रकारचा गुटखा विक्री सुरू आहे. अन्न औषध प्रशासन विभाग अंबाजोगाई शहरातील गुटखा विक्रीला बंद का ?करत नसेल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!