आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
चर्मकार समाजाच्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी मुंबईत एक ऑक्टोबर रोजी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भावी आमदार इंजि. शिंदे यांनी केले आहे,,,!
केज प्रतिनिधी चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री माननीय बबनरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या सोबत बैठक घेण्यात आली होती व त्या बैठकीत सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्याची अद्याप पर्यंत कसलेही प्रकारे अंमलबजावणी झाली नाही याचा जाब विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देण्यासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार यांनी शिंदे साहेब यांनी केले आहे संत रोहिदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरण माफ करण्यात यावे संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी 100 एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावा संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी संत रविदास कौशल्य विकास वाडी प्रमाणे सुरू करून वाढीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे केंद्र सुरू करण्यात यावी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात असलेले कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरील कर्मचारी रद्द करून चर्मकार समाजाच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला मुंबई येथे प्रशस्त असे मुख्य कार्यालय देण्यात यावे चर्मकार समाजाचा आयोग सुरू करून त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रलंबित असलेल्या सर्व कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावेत संत रोहिदास शर्मा उद्योग व चर्मकार विकास महामंडळाला प्रत्येक जिल्ह्यात अद्यावत असे कार्यालय देऊन जिल्हा व्यवस्थापक व कर्मचारी यांची भरती करण्यात यावी या व इतर अशा अनेक मागण्या करिता मुंबईमध्ये होत असलेल्या या प्रचंड मोर्चा लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार यांनी शिंदे साहेब यांनी केले आहे.




