१७६ शिबिरार्थींच्या सहभागाने मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न…
शिबिर नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
१७६ शिबिरार्थींच्या सहभागाने मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न…
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १५ डिसेंबर…

अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ, त्रंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत आणि सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय, तळेगाव दाभाडे (स्टेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिरात १७६ शिबिरार्थींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हे शिबिर नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

जेष्ठ पत्रकार, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे सल्लागार शिबिराचे उद्घाटक सुरेश साखवळकर यांनी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, खजिनदार कैलास काळे, सदस्य डॉ मिलिंद निकम, अमित बांदल, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे, ४० बालसंस्कार प्रतिनिधी, शिबिरार्थी आणि पालक उपस्थित होते.

आज सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, समाजात निती मुल्यांचा ऱ्हास होत आहे. सामाजिक विस्कटलेली घडी बसवणे, सुसंस्कृत पिढी तयार करणे, मुलांवर योग्य संस्कार घडावेत, देशात पुन्हा शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे युगपुरुष जन्माला यावेत यासाठी मूल्य संस्कारांची गरज या मार्गाद्वारे राबवली जात आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून देश विदेशातील जवळपास दहा हजार केंद्रांवर ही सेवा दिली जात आहे.
या एक दिवसीय शिबिरा दरम्यान अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालत मुलांच्या सर्वांगीन व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना योगासने, प्राणायाम, आरोग्यशास्त्र, आत्मसंरक्षण, पर्यावरण या सर्व उपयुक्त शास्त्रांची थोडक्यात माहिती देण्यात आली. मुलांना मूल्य संस्काराची शिकवण देऊन त्यांना आदर्श नागरिक म्हणून घडविण्यासाठी यापुढे दर रविवारी सकाळी एक तास सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनाच्या प्रांगणात हे शिबिर नियमितपणे घेतले जाणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिले.



