*सचिन बनसोडे यांचा आदर्श डोळ्या समोर घेवून आजच्या युवकांनी जिद्द बाळगावी-सैदप्पा झळकी*

अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि.११ रेल्वेत कामाला लागून कुटुंब सांभाळत, नौकरी करत विविध स्पर्धा परीक्षा देऊन श्री सचिन बनसोडे हे वरीष्ठ पद भूषवित आहेत.त्यांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी प्रयत्न करुन यशस्वी व्हावे.असे आवाहन रिपाइं आठवले गट चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री.सैदप्पा झळकी यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे बोर्डाची परीक्षा देऊन सेवेत नियुक्त झालेल्या सचिन बनसोडे सध्या मुंबईत नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो येथे कार्यरत आहे. नुकतेच सोलापूर येथे आले असता त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिपाइं(आठवले गट) च्या वतीने पेटा बांधून शाल व पुष्प गुच्छ देवून गौरविण्यात आले आहे.
या आधी सोलापूर रेल्वे विभागाचे मुख्य कल्याण निरीक्षक म्हणून सचिन बनसोडे यांनी काम केले आहे.त्यांना बढती मिळाल्याने रिपाइं (आठवले गट) च्या वतीने सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी व दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांनी हस्ते सत्कार करण्यात आली आहे.
या प्रसंगी दुधनी बुकींग सुपरवायझर वेलुमुरगन केशवन,रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, उत्तम आदमाने,शशिकांत वाघमारे, सुधीर साळवे,नामदेव बनसोडे,गौरव बनसोडे, बसवराज जमादार,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, सद्दाम शेख,विठ्ठल दुपारगुडे,आदी उपस्थित होते.



