आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्य मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण…..,!

Spread the love

मुंबई:- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब तथा भिमराव रामजी आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शुक्रवार दि. 30/08/2024 रोजी राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या हस्ते अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या प्रबळ पाठपुराव्याने व राज्य सरचिटणीस  सुनिल निरभवने यांच्या अथक प्रयत्नाने मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवन मधील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयासमोरील असलेल्या ईमारतीलगत असलेल्या जागेवर या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी रा प मार्ग महामंडळातील अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाह महाराष्ट्र राज्यातील कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि सदस्य मोठया संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!