आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूरच्या प्रा. पल्लवी प्रदीप तडकल “नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड”ने सन्मानित….!

Spread the love

नवी दिल्ली : सोलापुरातील “तडकल इंग्लिश मीडियम स्कूल”च्या प्राचार्या पल्लवी प्रदीप तडकल यांना सोमवारी “नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड”ने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीत भारती विद्यापीठामध्ये आयोजित एका शानदार कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा. तडकल यांना प्रदान करण्यात आला. आयोजक डॉ. मनीष गवई, नॅशनल युथ अवॉर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच नवी दिल्ली स्थित भरती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्रा. एम. एन. होडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नवी दिल्लीतील ऑल इंडिया युथ फाऊंडेशन टीम झेनिथ इंटरनॅशनल इंडियन गॅलक्सी फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल प्रा. तडकल यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!