आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदेड शहर विकास व नागरी समस्यांबाबत लोकविकास समन्वय संघर्ष समिती सोबत मनपा आयुक्त बैठक घेणार.

Spread the love

नांदेड :- (सखाराम कुलकर्णी) : नांदेड मनपा हद्दीतील नगरीकांचे दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न व शहर विकास समस्यां बाबत लोकविकास समन्वय संघर्ष समिती नेहमीच प्रयत्नशिल असते. व या सोईसुविधा साठी समितीने १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण आंदोलन पुकारले होते. याची दखल महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांनी घेऊन समिती सोबत चर्चा करण्यास समितीला दि.१४ ऑगस्ट ला बोलावले.

शहरवासीयांना भेडसावणाऱ्या दैनंदीन समस्या, रस्ते, अरोग्य, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, शिक्षण, मालमत्ता व पाणी कर, इत्यादी बाबत समितीने दि. १३ मे व दि ०१ जुलै २०२४ रोजी आयुक्तांना लेखी निवेदन देऊन सांमजस्याने चर्चा करून उपाय योजना करण्या बाबत बैठक घेण्याची विनंती केलेली होती. अन्यथा समिती दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी ज्येष्ठ सदस्यांसह नागरीकांना सोबत घेऊन मनपा कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याबाबत दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी लेखी पत्राद्वारे मनपा प्रशासनास कळविले होते. त्याचीच फलश्रुती व आयुक्तांसोबत प्रत्यक्ष भेटीअंती दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी मा.आयुक्त व समितीतील सदस्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामूळे समितीने तुर्तास अमरण उपोषणाचा बेत रद्द केला आहे. शहरातील सर्व विकासप्रेमी व सुजाण नागरीकांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या वार्ड तथा प्रभागातील नागरी समस्यां व शहर विकास प्रश्नी आपले लेखी निवेदन लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर पाठवाव्यात दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता मनपा कार्यालयासमोर जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!