आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी अविरत काम करणार – खा.धैर्यशील मोहिते पाटील*

सोलापूर विकास मंचच्या वतीने बुके ऐवजी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याबद्दल केले कौतुक

Spread the love

सोलापूर:- सोलापूर जिल्हातील युवकांचे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर थांबण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी समवेत सर्व सोलापूरकरांची सकारात्मक साथ असणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी केंद्रातील विविध मंत्रालय आणि खात्यांच्या अधिकार्‍यां समवेत वेळोवेळी पाठपुरावा करून अविरत काम करणार असल्याची ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

देगाव रोड येथील वसुंधरा अपार्टमेंट मध्ये प्रा.सारंग तारे यांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची चर्चा झाली. सोलापूर विकास मंचच्या वतीने बुके ऐवजी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याबद्दल कौतुक केले. सोलापूर विकास मंच नेहमीच समाजाने आदर्श घ्यावा असेच कार्य करत आहे. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, सुहास भोसले, आनंद पाटील, धनराज बगले, गणेश शिलेदार,नरेंद्र भोसले, आरती अरगडे, गौरी आमडेकर आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!