आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*लोकविकास समन्वय संघर्ष समितीची मासिक बैठक संपन्न*

Spread the love

नांदेड-(सखाराम कुलकर्णी)हनुमान मंदिर विजयनगर नांदेड येथे गणेशराव मस्के यांचे अध्यक्षतेखाली लोकविकास समन्वय संघर्ष समितीची मासिक बैठक संपन्न झाली.ह्या बैठकीत महापालिकेच्या असंख्य समस्येवर व वीज दरवाढ यावर चर्चा होऊन पुढील कोणते व कसे आंदोलन करायचे यावर सर्वांमध्ये चर्चा झाली. लोकविकास समन्वय संघर्ष समिती जनतेच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवून वेळप्रसंगी आंदोलन करून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवायचे काम करते. या समितीची मासिक बैठक हनुमान मंदिर विजय नगर नांदेड येथे संपन्न झाली व अध्यक्षस्थानी हनुमान मंदिराचे अध्यक्ष गणेश राव मस्के हे होते. बैठकीच्या सुरुवातीस लोकविकास समन्वय संघर्ष समितीचे प्रमुख कॉ. के.के जामकर यांनी बैठकीचे विषय सांगितले. त्यावर या बैठकीत विद्युत दरवाढ, महापालिकेची मालमत्ता कर वाढ, पाणीपट्टी कर वाढ, रुग्णहक्क आदी बाबीवर चर्चा झाली. महापालिकेने अचानक अवाजवी ५०० रुपये मालमत्ता कर वाढवला. पाणीपट्टी कर वाढ आहेच .पाणीपट्टी भरूनही पाणी नियमित व शुद्ध पाणी मिळत नाही .तसेच विद्युत कर भरमसाठ वाढलेले आहेत. अशा विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर, प्रा. रामकृष्ण जामकर. एड. धोंडीबा पवार ,सखाराम कुलकर्णी, नरसिंग मुदीराज, पाटील, जगन पांचाळ, कॉ. उज्वला पडलवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व शासनासह प्रमुख नेत्यांना निवेदने देण्याचे ठरले. तर वेळप्रसंगी ग्राहक तक्रार मंचात महापालिके विरुद्ध जाण्याचे ठरले. महापालिकेतील असंख्य समस्यांवर व अवाजवी करवाढीवर काय व कशी आंदोलन करायचे यावर एक मत होऊन भविष्यात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचे सर्वानुमते ठरले .आजच्या बैठकीस पुरुषोत्तम कुलकर्णी, शिवाजी कंठाळे ,रमेश यानुसार, नर्सिंग मुदिराज, परशराम कऱ्हाळे, दिगंबर पावडे यांचे सह समितीतील सदस्याने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून चर्चेला प्रतिसाद दिला. बैठकीचे शेवटी आभार प्रदर्शन कॉ. के.के जामकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!