आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदमनगर बास्केटबॉल संघाचा 15 वा वर्धापन दिन मोठया जल्लोषात साजरा….:-

Spread the love

सोलापूर:-पदमनगर बास्केटबॉल संघाचा 15 वा वर्धापन दिन  क्रीडा शिक्षक श्री राजेंद्र गोटे सर व सौ.मंगल गोटे यांच्या उपस्थीतीत व पदमनगर बास्केटबॉल संघातील खेळाडूंसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. गोटे सर यांचा सत्कार AR    न्यूज नेटवर्क चॅनलचे वृत्त संपादक समर्थ सोरटे यांनी, केला तर मंगल गोटे मॅडमचा सत्कार कानडे मॅडम यांनी केला.याप्रसंगी गोटे सर यांनी सर्व खेळाडूंना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देवून चांगले खेळाडू बनण्याचा व आपल्या संघाचे नाव उज्वल करण्याचा सल्ला दिला.

यावेळी प्रशिक्षक श्रीधर गायकवाड सर, प्रबुध्द चिंचोलीकर सर, आनंद वल्लाकाटी सर, श्रीशैल गुरव सर , अंजली वल्लाकाटी, पालक येदूर , ताटीपामूल ,कानवडे मॅडम, माने काकू, गुरव काकू, कटटे मॅडम, रायचूरकर मॅडम व सर्व खेळाडू उपस्थीत होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री परांडकर सर यांनी सुबक अशी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या काय्रक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद वल्लाकाटी सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!