आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात…! सामाजिक शास्त्र संकुलाने मिळवले प्रथम सर्वसाधारण विजेतेपद

युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थी कलाकारांना व्यासपीठ देणार - कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर

Spread the love

सोलापूर:- (संगप्पा कांबळे याजकडून)सोलापूर सारख्या ग्रामीण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले कलागुण आहेत. या विद्यार्थ्यांच्या कलागुनांना युवा स्पंदन सांस्कृतिक मोहत्सवातुन प्रत्येक वर्षी व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचेे प्रतिपादन कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यापीठ परिसरातील अधिविभागांचा युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला होता. या युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र हास्यसम्राट दीपक देशपाडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. केदारनाथ काळवणे, समन्वयक डॉ. विकास कडू यांच्या उपस्थित विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात रांगोळी, पोस्टर मेकिंग, स्थळ चित्रण, मेहंदी, स्पॉट फोटोग्राफी, मराठी , हिंन्दी आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, सुगम गायन, लघुनाटिका, थिम डान्स, लोकनृत्य, फनफेअर, फॅशन शो आदी कलाप्रकारांचा समावेश होता.
युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सामाजिक शास्त्रे संकुलाने सर्वाधिक पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक पदार्थ विज्ञान संकुल आणि तृतीय क्रमांक रसायनशास्त्र संकुलाने मिळवला या सर्व संकुलातील विद्यार्थ्यांना कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.
यावेळी हास्यकल्लोळचा प्रयोग सादर करताना दिपक देशपांडे यांनी संवादफेक, आवाजातील चढउतार, भाषेवरील प्रभाव व भाषा शैलीच्या माध्यमातून पोलिस खात्यातील इन्स्पेक्टर, बस स्थानकावरील कन्ट्रोलर, सोलापूरच्या मराठी भाषेवर असलेला कानडी, तेलुगू व हिंदी भाषेचा प्रभाव आदी बाबींवर नेमकेपणाने प्रकाश टाकत देशपांडे यांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. यावेळी देशपांडे यांनी प्रात्यक्षिक सादर करताच उपस्थितांमध्ये अक्षरश: हास्याचे फवारे उडाले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. विकास कडू यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!