सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…..!

सोलापूर १० – सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहर कार्यालय, रेल्वे लाईन्स, सोलापूर येथे शहराध्यक्ष श्री. सुधीर खरटमल यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधीर खरटमल म्हणाले की आज आपल्या देशातील स्त्रिया सर्व क्षेत्रात भरारी घेत असून त्याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जाते. आज आपल्या देशात सगळ्याच क्षेत्रात महिला उच्च पदावर विराजमान असून दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत आहेत. ते पुढे म्हणाले की जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची संधी उपलब्ध झाली. येत्या काळात महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यानी या वेळी सांगितले की सावित्रीबाई फुले यांचे त्या काळातील शिक्षणातील योगदानामुळे आज महिला मुख्य प्रवाहात येऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे काम करत आहेत, तसेच सावित्रीबाई फुले यांना त्याकाळी अनेक अडचणींना समोर जावं लागेल, त्यांचे हे योगदान देश कधीही विसरणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नदाफ, प्रा. राहुल बोळकोटे, बळीराम एडके, सुर्यकांत शेरखाने, समर्थ लवटे, रामप्रसाद शागालालू, शक्ती कटकधोंड, प्रमोद भवाळ, इस्माईल बागवान, सुरेश कुंभार, द्वारकाप्रसाद तावनिया, सुनीलकुमार इंगळे, मोईन नदाफ, अनिस शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



