आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा ग्राहकमंचाचा महत्वपूर्ण निर्णय..!

तज्ञांच्या सल्ल्याविना पिकांवर शेतकऱ्याची औषध फवारणी - नुकसानीस औषधविक्रेता जबाबदार नाही....!

Spread the love

सोलापूर – तज्ञांच्या सल्ल्याविना शेतकऱ्याने त्याच्या पिकांवर औषधाची फवारणी केल्यास पिकाच्या झालेल्या नुकसानीस औषध विक्रेत्यास जबाबदार धरता येणार नसल्याचा निष्कर्ष नोंदवून महिला शेतकरी सुनंदा कापसे यांच्या पीक नुकसान भरपाईची याचिका सोलापूर जिल्हा ग्राहकमंचाने फेटाळली आहे.
याची हकीगत अशी की, जून २०२१ मध्ये भोगाव ता. उत्तर सोलापूर येथील शेतकरी सुनंदा अनिल कापसे यांनी शेतात लावलेल्या उडीद पिकाला किड लागू नये व उत्तम फळधारण व्हावी याकरिता सोलापूर येथील शेती औषध विक्रेते ‘ढेकळे एन्टरप्रायझेस’ यांच्या शिफारशीने त्यांच्याकडून दोन प्रकारची औषधे खरेदी केली. परंतु त्या औषधाची उडीद पिकावर फवारणी केली असता संपूर्ण पीक २-३ दिवसात करपून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले वगैरे आशयाची तक्रार कापसे यांनी ग्राहक मंचात देऊन औषध विक्रेते ‘ढेकळे एन्टरप्रायझेस’ व औषध निर्मिती कंपनी यांच्याकडून चुकीच्या व बोगस औषधामुळे झालेल्या आर्थिक व मानसिक त्रास तसेच नुकसानीबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली होती.
तर ‘ढेकळे एन्टरप्रायझेस’ तर्फे ॲड. आल्हाद अंदोरे व ॲड. अथर्व अंदोरे यांनी युक्तिवाद करताना ‘ढेकळे एन्टरप्रायझेस’चा सोलापूर जिल्हा व परिसरात चांगला नावलौकिक असून बोगस औषधाची विक्री त्यांनी कधीही केली नसल्याचे सांगताना प्रस्तुत प्रकरणी शेतकऱ्याने औषध फवारणीपूर्वी तज्ञांचा सल्ला घेतला नसल्याने तसेच अन्य अनेक कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असल्याने त्यास औषध विक्रेते व निर्माते जबाबदार ठरु शकत नसल्याचा युक्तिवाद ॲड. अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून ग्राहक मंचाचे अध्यक्ष अ.सि.भैसारे आणि सदस्य सौ.बबिता महंत-गाजरे यांनी कापसे यांची ग्राहक तक्रार फेटाळली आहे.
या प्रकरणात ‘ढेकळे एन्टरप्रायझेस’ तर्फे ॲड. आल्हाद अंदोरे व ॲड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले तर कापसे यांच्यातर्फे ॲड.डी.आर.उंबरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!