सोलापूरातील दुबईस्थित उद्योजक सोमलिंगय्या गुरूपादय्या हिरेमठ यांचा श्री सिद्धेश्वर फाऊंडेशन कडून,‘श्री सिद्धेश्वर उद्योगरत्न पुरस्कार ‘ देऊन गौरव…..!

सोलापूर:-श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षतासोहळ्याच्या शुभमुहुर्तावर सोलापूरचे दुबईस्थित उद्योजक सोमलिंगय्या गुरूपादय्या हिरेमठ यांचा श्री सिद्धेश्वर फाऊंडेशन कडून‘श्री सिद्धेश्वर उद्योगरत्न पुरस्कार ‘देऊन गौरव करण्यात आला.

श्रीमंत घराण्यातील उद्योजकांचे सर्वच जण सत्कार करत असतात.परंतू परिस्थितीने अत्यंत गरीब असलेल्या , लहानपणी परंपरेनुसार चार घरी भिक्षा मागितल्याशिवाय स्वगृही भोजन न करू शकणारे, गरीबीमुळे ३ री च्या पुढे शिक्षण न घेऊ शकलेले हिरेमठ आज स्वबळामुळे ३७ वर्षे दुबईत टिकून राहून त्यांनी स्वत:चा उद्योग निर्माण केला आहे. एके काळी समाजासमोर हात पसरणारे हिरेमठ आज दुबईच्या लोकांना काम देणारे उद्योजक बनले आहेत . त्यांचा आम्हास अभिमान आहे, सोलापूरबद्दलची नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न श्री सिद्धेश्वर फाऊंडेशन करत आहे अशा शब्दात श्री सिद्धेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थअण्णा सर्जे यांनी हिरेमठ यांचा गौरव केला.

त्यांचा सन्मानपत्र ,सोलापूरी चादर देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गुरूशांत रामपुरे, सचिव डॅा. अनिल सर्जे, समन्वयक सिध्दाराम आलुरे, राजेंद्र बलसुरे, चंद्रकांत स्वामी, सिद्धाराम कोरे मामा, गवसणे काका, ॲड. बिराजदार, अरविंद सुरवसे, शिवराज स्वामी व परिसरातील
नागरिक उपस्थित होते.



