आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त अनिमेष मिश्रा (पेंन्शन) व क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अपराजिता जग्गी यांच्याशी कमांडर अशोक राऊत यांची मिनिमम पेन्शन वाढीबाबत सकारात्मक चर्चा…..!

Spread the love

भवानीनगर : दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रव्यापी आंदोलना दरम्यान देशांमधील 110 ईपीएफओ कार्यालयांवर धरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथील भिकाजी कामा प्लेस मुख्यालय ईपीएफओ ऑफिसवर राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली धरणा प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी चर्चा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संघर्ष समितीच्या चार सदस्य प्रतिनिधी मंडळाला बोलवण्यात आले त्यादरम्यान आपल्या मिनिमम पेन्शन वाढीच्या व मेडिकल सुविधांच्या बाबतीतल्या मागण्यांवर सकारात्मक विचार चालू असून यावर त्वरित निर्णय घेण्याचे काम चालू असल्याचे वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनिमेष मिश्रा अतिरिक्त केंद्रीय मुख्य भविष्य निधी आयुक्त (पेंन्शन ) व श्रीमती अपराजिता जग्गी यांना देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी  यांच्याबरोबर दोनदा मिनिमम पेन्शन वाढीबाबत झालेल्या तसेच केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव  तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी झालेल्या चर्चेची आठवण करून देऊन मिनिमम पेन्शन रुपये 1000 वरुन रुपये 7500 करण्यात यावी तसेच सर्व पेन्शन धारकांना मोफत दर्जेदार मेडिकल सुविधा मिळाव्यात व कसलाही भेदभाव न करता सर्व पेंन्शन धारकांना वास्तविक वेतनावर उच्च पेन्शनचा लाभ तसेच 1 सप्टेंबर 2014 च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेंन्शन धारकांना देखील उच्च पेन्शनचा लाभ मिळावा यावर चर्चा झाली.
चार सुत्रीय मागण्यांवर प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर मंजुरी मिळावी. अन्यथा दिल्ली येथे 30 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषण करण्यास भाग पाडू नका असेही त्यांना सांगण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा, दिल्लीचे अध्यक्ष बी. एस. राणा व समन्वयक राजेंद्र सिंह छेत्री, अशोक तंवर, धर्मवीर सुनीता डेव्हिड हे उपस्थित होते.


*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष,राष्ट्रीय संघर्ष समिती इंदापूर तालुका
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!