ताज्या घडामोडी

सर्वसामान्यांसाठी पुणे लोणावळा लोकल प्रवासाची मुभा

Spread the love

पुणे : लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना पुणे – लोणावळा लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांसाठी 15 ऑगस्ट पासून लोकल सेवा खुली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर पुणे- लोणावळा लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी नवे आदेश 14 ऑगस्ट रोजी काढले. त्यानुसार आता पुणे – लोणावळा लोकल प्रवासाला परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ओळखपत्राबाबत संभ्रम-

पुणे – लोणावळा लोकल प्रवासाचा पास मिळवण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. ओळख पत्र देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे .परंतु आवश्यक ओळखपत्र देण्याची कोणतीही यंत्रणा अद्याप स्थानिक प्रशासनाने सुरू केलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!