“डिझाईन, ट्रेडिंग, ग्राफिक, इंटेरियर, फॅशन व ॲनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या संधीला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत”- धर्मेश टांक

सोलापूर:- “डिझाईन, ट्रेडिंग, ग्राफिक, इंटेरियर, फॅशन व ॲनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या संधीला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत”असे प्रतिपादन धर्मेशजी टांक यांनी केले . ते वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा द्वारे आयोजित करण्यात आलेल्या “डिझाईन, ट्रेडिंग, ग्राफिक, इंटेरियर, फॅशन व ॲनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या संधी”, ह्या विषयावरील विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य .श्री अनुप म्हेत्रे सर, पर्यवेक्षक डॉ. जिवरज कस्तुरे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सह समन्वयक श्री. विजय वाघमोडे उपस्थित होते.
व्याख्यानात पुढे बोलताना श्री. धर्मेशजी टांक म्हणाले की, ” पारंपरिक करिअरच्या संधी न निवडता डिझाईन क्षेत्रात जागा जास्त आणि विद्यार्थी कमी तसेच या क्षेत्रात पगारही मोठ्या प्रमाणात दिला जातो. आयआयटी प्रमाणे डिझायनिंग क्षेत्रात एफ.आय. टी. शिक्षण पूर्ण करून भारत आणि भारताबाहेर ही नोकरी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते हे विविध उदाहरणाद्वारे व सोलापुरातील डिझायनर या क्षेत्रात काशा पद्धतीने कार्य करत आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितले”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.श्री अनुप म्हेत्रे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा उप प्राचार्य प्रा.श्री अनुप म्हेत्रे सर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय वाघमोडे यांनी तर आभार प्रा.डॉ.जिवराज कस्तुरे सर यांनी मानले .कार्यक्रमास विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



