आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बलिदान चौकातील सीसीटीव्हीचे लोकार्पण*

Spread the love

सोलापूर,:– बलिदान चौक तरुण मंडळ,दादा गणपती व जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे येणारा गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून बलिदान चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.

माजी नगरसेवक जगदीश पाटील व नगरसेवक अमित पाटील यांच्या सहकार्याने सदर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. या सीसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांचे हस्ते झाला.  करणकोट यांचे हस्ते पूजन करून सीसीटीव्ही सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना करणकोट म्हणाले, सीसीटीव्ही सेवा ही सध्या काळाची गरज असून तो आपल्या रक्षकाची भूमिका बजावतो. सीसीटीव्हीमुळे अप प्रवृत्तींवर वचक बसण्यास मदत होते. तसेच काही प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसतो. आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात या चौकात दररोज दोन ते अडीच लाख भाविक, विशेष करून महिला भाविकांची संख्या जास्त असते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सीसीटीव्हीची गरज होती हे ओळखून अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे.
यावेळी जगदीश पाटील,अमित पाटील, पूर्व विभाग गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे,गिरीश अक्कलकोटे, एच. जी.इंगळगी, रतन नरवडे,बाबू नरवडे, सोमा चडचणकर, अमोल शिंदे,प्रवीण मलकुनाईक, बाळासाहेब स्वामी, प्रशांत तेलकर,महादेव हरके यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!