ताज्या घडामोडी

रिपब्लिकन बहुजन सेनेच्या अंबाजोगाई तालुका युवक अध्यक्षपदी शेख सादिक शेख यांची निवड

अंबाजोगाई | दि. 20 नोव्हेंबर 2025 अंबाजोगाई येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते शेख सादिक शेख यांची रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या अंबाजोगाई तालुका युवक अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. शेख सादिक शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून समाजामध्ये त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी अनेक विषयांवर सातत्याने काम केले आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी समाजकार्याची वाट न सोडता आपले योगदान अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्यावतीने त्यांना तालुका युवक अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील व पक्षाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. ही निवड रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. विजयजी घाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रसंगी खालील पदाधिकारी उपस्थित होते — प्रमुख उपस्थिती : अनिल सावंत – बीड जिल्हा अध्यक्ष दयानंद लांडगे – युवा बीड जिल्हा अध्यक्ष बाबा गायकवाड – बीड जिल्हा कार्याध्यक्ष अरुण ताटे – बीड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे – बीड जिल्हा सचिव कालिदास सुरवसे – प्रमुख मार्गदर्शक मधुकर गाणणे – तालुका अध्यक्ष, अंबाजोगाई संदीप गोदम – तालुका उपाध्यक्ष यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेख सादिक शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!