*मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,* *पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!*
मंद्रूप ता. दक्षिण सोलापूर येथील जळती ग्रस्त कुटुंबास एम के फाऊंडेशनने दिला मदतीचा हात.

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील माळकवठे रोड वरील कोळी वस्ती येथील श्री गौरप्पा कोळी यांचे घर गॅस स्पॉट दुर्घटनेत संपूर्ण जाळून खाक झाल्याची घटना ४-५ दिवसापूर्वी घडल्याची माहित भागातील विविध व्यक्तींकडून तसेच पत्रकार बांधवांकडून एम के फाऊंडेशन चे संस्थापक श्री महादेव कोगनुरे यांना समजली होती, दुर्घटनेत संपूर्ण घर, अन्नधान्य, कष्टातून जमा केलेली रोख रक्कम देखील जाळून खाक झाली, यांच्यासह उत्पनाचे साधन असलेली गाय देखील ह्या घटनेत होरपळून निघाली, दुर्घटनाग्रस्त कोळी कुटुंबाच्या संसाराची पुन्हा नव्याने सुरवात करण्याच्या व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून संसार उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.

“आज पर्यंत सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर तालुका तसेच अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातील जळीतग्रस्त कुटुंबास आमच्या एम के फाऊंडेशन च्या वतीने मदत करण्यात आली असून, अश्या कठीण प्रसंगी लोक प्रथम एम के फाऊंडेशनकडेच मदतीचा हात मागतात आणि त्यांना शक्यती मदत नक्की मिळेल ह्या विश्वासाने ते आमच्याकडे मदत मागतात, हीच आमच्या कार्याची पावती आम्ही समजतो आणि त्याचप्रमाणे आम्हाला शक्य होईल तेवढी मदत आम्ही फाऊंडेशन च्या माध्यमातून करत असतो, समाजाचा एक घटक म्हणुन गरजवंताना मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे” अशी भावना फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मंद्रूप गावच्या सरपंच सौ अनिता ताई कोरे, उपसरपंच श्री भगवान व्हणमाने, ग्रामसेवक श्री नागेश जमखंडी, टाकळी चे सरपंच श्री सतीश कोळी, कोळी समाज अध्यक्ष श्री बाबुराव कोळी, उद्योजक श्री सचिन चव्हाण, मा सरपंच श्री अमोघसिद्ध थोरात, श्री सिद्धाराम बिराजदार , श्री सिद्राम मैंदर्गी, श्री मलकारी कोळी, श्री रेवनसिद्ध कोकलगी, श्री सिद्राम उमराणे, श्री वीरेश कोळी , श्री अमोल कोळी, श्री मलप्पा कोळी, श्री हरीश कोळी , श्री पंडित कोळी, श्री दयानंद कोळी, श्री लक्ष्मण कोळी ,श्री प्रकाश शेतसंदि, श्री अर्जुन कोळी, श्री धनराज कोळी, श्री भीमाशंकर सुतार यांच्यासह फाऊंडेशन संचालक उपस्थित होते.




