ताज्या घडामोडी
माजी नगरसेवक अरुण बबनराव माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रवक्ते पदी निवड जाहीर.
वडगाव मावळ – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अरुण बबनराव माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रवक्ते पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे तसेच तालुक्याचे आमदार सुनिल शेळके तालुक्याचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकरसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.



