आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पणन हंगाम २०२३ -२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत धान व भरडधान्य खरेदीचे धोरण जाहीर*

Spread the love

मुंबई- (सखाराम कुलकर्णी) किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था मार्फत राज्यात एफ. ए. क्यू. दर्जाच्या धान्य व भरडधान्याची खरेदी करण्यात येत आहे. अशा आशयाचे परिपत्रक सचिव सुमंत भांगे यांनी नुकतेच जारी केले आहे.

खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या ज्वारी, बाजरी, मका व रागी च्या किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. याशिवाय आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीने धान विकावे लागू नये. म्हणून यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष व खरेदी केंद्र उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी धानाची, ज्वारीची, बाजरी, मका व रागी या भरडधान्याची खरेदी करण्यासाठी या परिपत्रकानुसार आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहिल. बिगर आदिवासी क्षेत्रात खरीप पणन हंगाम २०२३-२४मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान/ भरडधान्य खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई या अभिकर्ता संस्थेची या आदेशान्वये मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात येत आहे

.तर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या अभिकर्ता संस्थेची धान व भरडधान्य खरेदीस मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने धान ,भात याची साधारण एफ.ए.क्यू. किंमत २१८३ रुपये ,अ दर्जा २२०३रुपये, ज्वारी संकरित ३१८०रुपये, ज्वारी मालदांडी ३२२५ रुपये अशी आधारभूत किंमत ठरवली आहे. तसेच भरडधान्य खरेदीस बाजरी २५०० रुपये मका २०९० रू.रागी ३८४६रुपये अशी आधारभूत किंमत ठरवली आहे . अभिकर्ता संस्था प्रशिक्षित ग्रेडर्स कडून तपासणी अंतिच धान/ भरडधान्य खरेदी करतील. या धान /भरडधान्याची दर्जात्मक तपासणी शासनाकडून (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षित कर्मचारी) करण्यात येईल .धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगाम धान दि.९-११-२०२३ते ३१-१-२०२४पर्यंत व भरडधान्य खरेदी हंगाम खरेदी कालावधी दि.१-१२-२०२३ ते ३१-१-२०२४ पर्यंत राहील .तसेच रब्बी पणन हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी माहिती अन्न नागरी पुरवठा सचिव सुमंत भांगे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!