कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न…..!

अक्कलकोट:-( तालुका प्रतिनिधी राजेश पवार ) सविस्तर बातमी अशी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ. सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, नालंदा विद्यार्थी वसतीगृह यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत शेगाव गजानन महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

यावेळी मूर्ती, ग्रंथ व पालखी पुजन संस्थेच्या संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीईओ सौ रूपाली शहा, ज्युनियर विभाग प्रमुख सौ पुनम कोकळगी व प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल- रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत नामदेव, संत मुक्ताई, जनाई, संत मीराबाई व वारकऱ्यांची वेशभूषा करून टाळ मृदंगाच्या तालात नाचत गाजत विठ्ठल नामाचा गजर करत पुष्पवृष्टी करत मोठया उत्साहात दिंडी काढण्यात आली. संतज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत गजानन महाराज यांच्या पालख्या तीन ठिकाणाहून एकत्र आल्यानंतर शाळेच्या आवारात मोठे रिंगण तयार करण्यात आले. यावेळी मुलानी पांढरा नेहरूशर्ट विजार व मुलीनी नऊवारी साडी परिधान केले होते. यारिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालात, पाऊले टाकीत, फुगड्या घालीत या सोहळ्याचा आनंद लुटला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख खंडेराव घाटगे, कुमार जाधव, निशिगंधा कोळी, सलोनी शहा, पूजा कडबगावकर, सुरेश रुग्गे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे ,निखिल भालेराव, प्रकाश पाटील,शिक्षक, कर्मचारी,पालक व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



