देशातील वाढते दलित अत्याचार पाहता पुन्हा एकदा नव्या ताकदीने “दलित पँथर” उभा करण्याची आवश्यकता आहे. – लखन सोरटे.*
*नातेपुते येथे रास्ता रोको आंदोलन व तीव्र निदर्शने.*

नातेपुते:- जि.नांदेड, ता.लोहा,बोंडार हवेली याठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव याचा हत्याराने भोसकुन व दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.
मुंबई येथे शिक्षण घेत असलेल्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या सावित्रीबाई फुले वसतीगृहात केली.,मातंग समाजाच्या बांधवाची 3000 रुपयांसाठी सावकाराने हत्या केली. अशा अत्यंत अक्षम्य घटनांनी देशात खळबळ माजली आहे. म्हणून या देशात पुन्हा “दलित पँथर” उभा करावी लागेल.तसेच जोपर्यंत बहुजनांकडे सत्ता येणार नाही तोपर्यंत अत्याचार होत राहतील, ज्यावेळी आपल्याकडे सत्ता येईल त्यावेळी आपण देशात व महाराष्ट्रात न्याय देऊ शकतो असे जनता आर्मी-इंडिया(J.A.I) संघटनेचे संस्थापक लखन सोरटे म्हणाले.
देशात प्रचंड अन्याय वाढलेले असताना सत्तेत बसलेली लोकं काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.नव्या फळीतील पँथर आक्रमक झालेत असे लखन सोरटे म्हणाले.प्रास्ताविक संघर्ष सोरटे यानी केले.
यावेळी पुरोगामी विचारांच्या संघटना, पक्ष यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली. प्रथम सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी लखन सोरटे,संघर्ष सोरटे रणजित कसबे, विशाल साळवे,विनोद रणदिवे, सुनिल ढोबळे, सौरभ सोरटे, बंटी सोरटे, समीर सोरटे, बाळासाहेब सोरटे, प्रा. उत्तम सावंत, डॉ. दत्तात्रय थोरात,रिपाइं प. महा.उपाध्यक्ष राजू वाघमारे, रिपाइं प. महा. उपाध्यक्ष एन. के. साळवे यांनी विचार व्यक्त केले.
जेष्ठ नेते श्रावण सोरटे, पोपट साळवे,अमर सोरटे,शिवाजी भोसले,बशीर काझी, शमुद्दीन मुलाणी,आदर्श सोरटे,राहुल सोरटे, विशाल सोरटे, सुगत सोरटे,निखिल सोरटे,बुद्धभूषण साळवे, प्रशांत साळवे,महादेव साळवे,प्रीतम साळवे,निखिल साळवे, राहुल साळवे,अखिलेश झेंडे,अमित मोरे,वैभव खिलारे,राहुल साळवे, रोहित साळवे,रोहित खिलारे,सुरज खिलारे आदी उपस्थित होते.
निवेदन मंडल अधिकारी राहुल चव्हाण, तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी स्वीकारले.
नातेपुते पोलीस स्टेशन चे सहा. पोलिस निरीक्षक .श्री.संपांगे व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.



