सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश….!

अक्कलकोट:-( प्रतिनिधी राजेश पवार) दि.2 महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल 94 .44 इतका लागला असून, विद्यालयात प्रथम कुमारी धनेश्वरी अण्णाराव भुरले- 94.45, द्वितीय-कु. साक्षी संभाजी सोलनकर 91 %, तृतीय- विठ्ठल वाडी व धोंडपा कोरे 90.20 गुण मिळवून यश संपादन केले आहे. तर 38 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत (डीस्टीन्कशन) उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी,सीईओ सौ रूपाली शहा, ज्युनियर विभाग प्रमुख सौ पुनम कोकळगी, संचालक मल्लिनाथ मसुती व प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले.



