एस जी जी एस महाविद्यालयातील संचालक पदाच्या नियुक्तीसाठी शासनाच्या सेवा प्रवेशाच्या अटी व नियमाचे विद्यमान प्राचार्याकडून उल्लंघन ?

नांदेड- (सखाराम कुलकर्णी ) श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी तंत्र शास्त्र महाविद्यालय नांदेड या संस्थेच्या संचालक तथा प्राचार्य पदाची जागा रिक्त होत असल्यामुळे नवीन प्राचार्य नियुक्तीसाठी विद्यमान प्राचार्य जोशी यांनी विशिष्ट उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या सेवा प्रवेशाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून जाहिरातीमध्ये या पदासाठीचे वय निकष 54 वर्षा वरून 60 वर्षे केली .याप्रकरणी शासनाने त्वरित लक्ष देऊन सेवा प्रवेशाच्या नियमानुसारच संचालक पद भरल्या जावे अशी मागणी होत आहे.

श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय नांदेड या स्वायत्त्य संस्थेचे विद्यमान प्राचार्य जोशी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आहे .पण सेवानिवृत्ती नाही. कार्यकाळ संपत असल्यामुळे नवीन संचालक तथा प्राचार्य पदाची भरती करण्यास नुकतीच जाहिरात प्रकाशित झाली .या जाहिरातीत उमेदवाराचे वय 60 वर्षापर्यंत असावे असा उल्लेख केला वास्तविक दिनांक 10 सप्टेंबर 2012 च्या जीआर मधील अटी व शर्तीनुसार प्राचार्यासाठी वय 54 वर्षापेक्षा जास्त नसावे असा उल्लेख सदरील नियमावलीत केलेला आहे. व हा कार्यकाल पाच वर्षाचा आहे. विद्यमान प्राचार्य जोशी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आहे. पण सेवानिवृत्ती एक वर्ष बाकी आहे .म्हणून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अथवा जास्त वयाच्या विशिष्ट जवळच्या उमेदवारास फायदा होण्यासाठी जाहिरातीमध्ये सर्व नियमाचे उल्लंघन करून वयाची अट साठ वर्षापर्यंत दिली .या अटीमुळे कोणी न्यायालयात गेले तर विद्यमान प्राचार्य जोशी यांनाच त्याचा फायदा मिळू शकतो. तो असा की न्यायालयीन प्रकरणामुळे न्यायालय निर्णय लागेपर्यंत प्रभारी पदावर जोशीच राहू शकतील .यामुळे पण जोशींनी जाहिरातीत वादग्रस्त व संचालक पदाच्या नियुक्तीसाठी असणाऱ्या सेवा प्रवेशाच्या अटी नियमाचे उल्लंघन केले .शासनाच्या जीआर प्रमाणे पद भरतीच्या अटी न देता स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण होणाऱ्या अटी नियम जाहिरातीत नमूद केल्या म्हणून या प्रकरणाकडे महाराष्ट्र शासन व तंत्र शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे आणि संबंधितांना चुकीचे वयाचा निष्कर्ष दुरुस्ती करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत व दोषीवर शासनाची दिशाभूल केल्यामुळे कठोर कार्यवाही करावी. भरती प्रक्रिया निपक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडली जाईल आणि महाराष्ट्र शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विद्यमान नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल याची खात्री करावी .अशा चुकीच्या नियमाकडे दुर्लक्षित केल्यामुळे अशा गैरकारभाराच्या प्रवृत्तींना बळ मिळते .अशी चर्चा महाविद्यालयातील प्राध्यापकात होत आहे.



