सर्व खड्डे तातडीने भरावे, अन्यथा बार्शीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करू- राकेश नवगिरे….!

बार्शी : शहरातील जुना पोस्ट चौक ते कुर्डुवाडी रोड बाह्यवळण रस्त्यापर्यंतचे सर्व खड्डे तातडीने भरावे, अन्यथा बार्शीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बार्शी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश नवगिरे यांच्या वतीने निवेदनाद्वारे केला आहे.
जुना पोस्ट चौक कुर्डुवाडी रोड बायपासपर्यंत जो रस्ता आहे, या रस्त्यावर सध्या मोठ मोठे खडे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकाना मोठी कसरत करत रस्त्यावरूण जावे लागत आहे. रोडवर नामवंत हॉस्पिटल असून वर अनेक रुग्णांची वर्दळ असते. यात गरोदर महिला, हृदयविकाराचे रूग्ण असतात. या खड्ड्यांमुळे पेशंटच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. खड्ड्यामुळे या रोडवर अनेक अपघात होत आहेत. लवकरात लवकर हे सर्व खड्डे बुजवण्यात यावे. १५ दिवसाच्या आत सर्व खड्डे बुजून घेण्यात यावे; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



