आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

*कर्नाटक चॅनेल झी कन्नड वाहिनीवरील सिंगींग रियालिटी‌ सारेगमप लिट्ल चॅम्प्स सीजन -19 ग्रँड फायनल मध्ये सोलापूरचा दिव्यांग बालक रेवणसिद्ध फुलारी*

*कर्नाटक मुख्यमंत्री श्री.बसवराज बोम्माई यांनी केले रेवणसिद्धचे कौतुक.....*

Spread the love

अक्कलकोट :-दिव्यांगत्वावर मात करून संगीत क्षेत्रातील महत्वाचे मानले जाणारे कर्नाटक राज्यातील झी कन्नड सारेगमप लिट्ल चॅम्प्स सीजन – 19 मध्ये सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र रेवणसिद्ध फुलारी ग्रँड फिनालेमध्ये निवड झाला आहे.अंतिम टॉप 6 मध्ये निवड झाल्याने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री.बसवराज बोम्माई यांनी रेवणसिद्ध फुलारीचे कौतुक करून झी कन्नड वाहिनीला शुभेच्छा दिले आहे.

जन्मतः दोन्ही डोळ्याने दिव्यांग असलेल्या परंतु दिव्यांगत्वावर मात करत तबलावादन, हार्मोनियम वादन ,पॅड ,कीबोर्ड, विणा आधी वाद्य वाजवण्यामध्ये कुशल असलेल्या आणि वाद्य वाजवत गायन करणारा रेवणसिद्ध पुंडलिक फुलारी कर्नाटक राज्यातील नंबर वन टीव्ही चॅनेल झी कन्नड वहिनीवरील कर्नाटक राज्यातील नंबर वन सिंगिंग रियालिटी शो सारेगामापा लिटल चॅम्प्स सीजन 19 मध्ये मागील सप्टेंबर 2022 पासून 24 आठवडा 48 एपिसोड मध्ये गायन करून स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला महाराष्ट्रातील दिव्यांग गायक म्हणून स्वतःचे ओळख निर्माण केले आहे.पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीयन बालक अंतिम स्पर्धेत प्रवेश केला आहे.


ग्रामीण भागातील सीमावर्ती भागातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि जन्मतः दोन्ही डोळ्याने दिव्यांग असलेल्या कुटुंबातील कोणताही व्यक्तीला संगीताचे पार्श्वभूमी नसताना हाताला मिळालेल्या घाघर, बकेट,टोपली, बादली,ग्लास आदी वस्तूंचे वाद्य म्हणून वाजवत गावातील बँजो गाडीचे आवाज ऐकताच तिथे हजर राहून वाद्य वाजवत गायनाला सुरुवात करून संगीताचे प्रारंभ घरातून सुरुवात करून कमी कालावधीत कर्नाटक राज्यातील कन्नड झी वाहिनीवरील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या सारेगमप लिट्ल चॅम्पस सीजन 19 साठी निवड होवून मागील 24 आठवडा आणि 48 एपिसोड मध्ये उत्तम गायन करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.विशेष करून कर्नाटक राज्यातील डॉ.राजकुमार घराण्यातील हॅटट्रिक हिरो श्री.शिवराज कुमार ,दिव्यांग बालकलाकार रेवणसिद्धला कर्नाटकातील फिल्म क्षेत्रातील क्षेत्रातील दिग्गज कलाकार हॅट्रिक हिरो शिवराज कुमार, डी बॉस दर्शन सर,प्रेम सर, रक्षिता मॅडम, आनंद सर ,डॉ.राघवेंद्र राजकुमार,पद्मश्री के.एस. चित्रा,रमेश सर, संगीत क्षेत्रातील भीष्म पितामह नादब्रह्म डॉक्टर हंसलेखा सर ,विजय प्रकाश सर अर्जुना जन्या सर,डॉ. सुचेतन रंगस्वामी,हेमंत सर,लक्ष्मी नागराज,इंदू नागराज,अनुराधा भट्ट,नंदिता मॅडम, प्रसिद्ध अँकर अनुश्री तसेच इतर कॉमेडी कलाकार ,महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील संगीतावर प्रेम करणारे सर्व मान्यवरांनी रेवणसिद्ध फुलारी यांच्या गायनाचा प्रशंसा करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!