आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

बोगस डॉक्टर वर कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा: यशवंत पवार यांचा इशारा….!

Spread the love

सोलापूर (प्रतिनिधी) – रुग्णांच्या  खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही अक्क्लकोट तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठीकाणी तालुक्यात बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे  उपचार करत आहेत. या बोगस व वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसलेल्या बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी अक्कलकोट यांच्याकडुन कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. बोगस डॉक्टर अक्कलकोट तालुक्यात विविध भागात दवाखाने थाटून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत असून गोरगरिबांना तज्ञ डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्णा उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत नाही. शिवाय रुग्ण हे डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करत नाही. आरोग्य विभागाकडून सोलापूर शहरासह तालुक्यातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. अक्कलकोट तालुक्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून बोगस डॉक्टरमुक्त तालुका करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तरी अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकीय परवाना नसलेल्या बोगस डॉक्टर वर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशारा ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!