ताज्या घडामोडी

मी अविकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी! तो योगीया पाहे- दिवाळी निरंतर..

माऊली म्हणतात- ज्यावेळी विवेकाची काजळी फेडली जाते--- त्यावेळी तो योगी होऊन आपला प्रत्येक दिवस दिवाळी म्हणून साजरी करतो!

Spread the love

मी अविकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी! तो योगीया पाहे- दिवाळी निरंतर– माऊली म्हणतात- ज्यावेळी विवेकाची काजळी फेडली जाते— त्यावेळी तो योगी होऊन आपला प्रत्येक दिवस दिवाळी म्हणून साजरी करतो!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विशेष लेख.

काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अनेकांना मत्सर वाटतो त्यांचा कधीकधी हेवा वाटतो आणि काही असेही लोक असतात या त्यांच्या हास्य बद्दल संशय व्यक्त करतात म्हणूनच त्याबद्दलही ते सारखे विचारत असतात कीतू असा नेहमीच असा हसरा का दिसतो तुझ्या आयुष्यात काहीच कधी समस्या तुला आली नाही का तुला कधी कोणाचा राग येत नाही का?

या सर्व प्रश्नांची उत्तरं देतांना हा माणूस यावर फक्त हसत असतो शेवटी खोदून विचारल्यावर तो म्हणतो मला दुसऱ्याचा आनंद बघून मला कधीही दुःख वाटत नाही एवढेच नव्हे तर मी एक तत्व स्वीकारलेलं आहे की माझं दुखणं मी दुसऱ्या कोणालाही सांगत बसत नाही कारण ताण-तणाव तर प्रत्येकालाच आयुष्यात येतच असतात मी सुद्धा त्याला अपवाद नाही पण मी हसतमुखानं त्या सर्व संकटांना समस्यांना ताणतणावांना अगदी ठरवूनच हसतमुखाने सामोरं जातो.

इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेत तो त्याच्या हसण्याचं उत्तर देतो पण आपण खोलात जाऊन याचा विचार केला तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय आहे त्यातल रहस्य आपण जाणून घेऊया मंडळी ही माणसं कधीच अपुरा अभ्यास किंवा अपुरी माहिती घेत नाही ते सर्व काम डोळे उघडे ठेवून करतात ते प्रत्येक गोष्टीचा डोळसपणे निरीक्षण परीक्षण करतात त्यामुळे त्यांचा निर्णय सहसा चुकत नाही आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये मनामध्ये आणि तसेच विचारांमध्ये असलेला विवेक हा अशाच डोळस माणसासारखा असतो तो सतत जागरूक असतो जेणेकरून योग्य निर्णय त्यांना घेण्यात कधीच कठीण वाटत नाही मित्रांनो अशी कल्पना करा की डोळे बंद करुन आपण एका आरशासमोर उभे आहोत त्यावेळी आपल्याला काही दिसत नाही तसंच जर आपल्यात असलेला विवेक आपण बाजूला ठेवून काही पाहण्याचा प्रयत्न केला तर योग्य ते दर्शन त्या गोष्टीच आपल्याला निश्चितच होणार नाही म्हणून विवेक हा एका अर्थी आपल्या दृष्टी सारखा असतो म्हणूनच आपला विवेक जागृत असेल तर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

म्हणूनच विवेक हा कोणत्याही क्षेत्रात अत्यंत आवश्यक आहेच म्हणून मित्रांनो आपल्यावर कोणताही प्रसंग आला तरी आपण विवेक सोडता कामा नये म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडू नि विवेक दीप उजळी तो योगिया पा हे दिवाळी निरंतर असा विवेकशील माणूस प्रत्येक दिवस दिवाळी म्हणूनच साजरी करतो त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण असं प्रसन्न हास्य विलसत असतं हेच खरं त्या हसऱ्या व्यक्तिमत्त्वाचं रहस्य आहे.

लायन. डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!