ताज्या घडामोडी

तळेगावातील तीर्थ कुलकर्णी गणित परीक्षेत देशपातळीवर दुसरा

Spread the love

तळेगाव : राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धेत केवळ पंधरा मिनिटात १०० गणिते सोडवून बारा वर्षीय तीर्थ परेश कुलकर्णी यांने अखिल भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

लहानपणापासून तीर्थ याला गणिताची गोडी लागली आहे. अगदी कमी वेळात झटपट गणित सोडवण्यात तो निपून आहे.तीर्थ हा अष्टपैलू कलाकार असून तो तबला उत्तम वाजवतो. संगीत शिक्षक समीर महाजन यांचे मार्गदर्शन त्यांला लाभले आहे. तबला परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला असून आता भजनाला ही तो साथ करतो. महाराष्ट्रातील पंधरावा अध्याय गीता पाठांतर स्पर्धेत तो राज्यात दुसरा आला होता.सुजाता नागापूरकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते.

तीर्थ याने देशात व्दितीय येऊन नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल तळेगाव शहरातील अनेक सेवाभावी संस्थांनी त्याचा गौरव केला आहे. शाळेचे नाव उंचावल्या बद्दल प्राचार्य डॉ. इस्तीयक शेख व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.

आई व आजीने प्रोत्साहन दिल्याने व प्रशिक्षिका दीपा राऊत यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आले, असे तीर्थ कुलकर्णी यांने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!