ताज्या घडामोडी

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक पुसटशी सीमा रेषा असते. अज्ञान- अगतिकता आणि अविवेक यातूनच अंधश्रद्धेचा उगम होतो. डॉक्टर शालिग्राम भंडारी.

प्रतिकात्मक ईश्वराची पूजा करणे, त्याचं नामस्मरण करणे, कुठल्याही पूजाआर्चाच अवडंबर न करता भजन कीर्तन प्रवचन यातूनच अंतकरण उजळून निघणे यातूनच सन्मार्गाने जीवन जगणे हीच खरी श्रद्धा आहे.

Spread the love

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक पुसटशी सीमा रेषा असते. अज्ञान- अगतिकता आणि अविवेक यातूनच अंधश्रद्धेचा उगम होतो.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १८ फेब्रुवारी.

लोकांच्या अज्ञानाचा- संवेदनशीलतेचा- श्रद्धाळूवृत्तीचा गैरफायदा घेण्यास अनेक भोंदूबाबा टपलेलच असतात! यासाठी प्रतिकात्मक ईश्वराची पूजा करणे, त्याचं नामस्मरण करणे, कुठल्याही पूजाआर्चाच अवडंबर न करता भजन कीर्तन प्रवचन यातूनच अंतकरण उजळून निघणे यातूनच सन्मार्गाने जीवन जगणे हीच खरी श्रद्धा आहे.

 

बुद्धीचा वापर न करणाऱ्या भाबड्या देवभोळ्या लोकांना असं वाटतं की सारे काही देवाच्या कृपेमुळे घडत आहे इतकंच नव्हे तर झाडाचं पान सुद्धा देवाच्या आदेशाने हलत आहे शेवटी तो म्हणतो देवाची सर्व लीला अपरंपार आहे वास्तविक या सर्व गोष्टी निसर्ग तत्त्वानुसार घडत असतात नैसर्गिक परिस्थितीचा विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते वास्तविक या गोष्टी निसर्ग तत्त्वानुसार घडतात त्याला देवाचा आदेश मानण्यात एक प्रकारच अज्ञानच आहे याची कधीतरी जाणीव त्याला होत असते अर्थात,अज्ञानाची ही जाणीव होणे हाच हा ज्ञानाचा प्रथम प्रारंभ असतो.

याउलट ज्ञानी माणूस प्रत्येक घटनेमागे वैज्ञानिक कारण जाणून घेतो त्यासाठी स्वतंत्र बुद्धीने तो विचार करतो दुर्दैवाने जे बुद्धीचा कधीच विचार करीत नाहीत. नाही त्या व्यक्तींच्या सुप्त भावना जागृत होतात आणि त्यांच्या नकळत ते भावनेच्या आहारी जातात त्यामुळे सारासार विचार करण्याचं भानही त्याला त्यांना राहत नाही दुर्दैवाने ते शकुन-अपशकुन या चक्रात अडकून पडतात मांजर आडवी गेली तर माझं काम होणार नाही असं त्यांना सारखं वाटत राहतं वास्तविक मांजरा मध्ये एवढी शक्ती असती तर प्रतिस्पर्ध्यांनी मांजर एकमेकावर सोडली असती त्यांनी सभा संमेलनं गाजविली नसती अर्थात या मागचा लोकभ्रम होण्याच कारण अस असाव की पूर्वी एकट्याने जंगलातून पायवाटेने जाताना आजूबाजूला झाडाझुडपात एखाद्या जनावराची किंवा विषारी सापाची चाहूल जर त्या मांजराला लागली असेल तर ते मांजर घाबरून पटकन त्या पायवाटेने पलीकडे जात असाव आणि त्याच वाटेवरून गडबडीने निघालेल्या त्या माणसाला ते मांजर आडवं जाताना दिसावं त्यासाठी त्यांन थोडं थांबून परत कानोसा घेऊन पुढे जावं आणि थोडं थांबावं असा त्याचा हेतू असावा या सर्व त्याच्या वर्षानुवर्षे कृतीचं त्याच्याही नकळत अंधश्रद्धेत रूपांतर झालं असावं आणि म्हणूनच माणसाचा वैचारिक पाया हा जर विज्ञानाच्या आधाराने घातला गेला असेल तर तो कधीच अंधश्रद्धेला बळी पडणार नाही.

मित्रांनो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी ती कशी आणि केवढी असावी जेवढं जेवणात मीठ आवश्यक असतं तेवढंच अन्यथा ते त्या मीठ नसलेल्या बेचव अन्नपदार्थ सारखंच होईल कारण,श्रद्धा ही कार्य सिद्धी साठी प्रेरक असते. मित्रांनो म्हणून विचार करा एखादा विद्यार्थी परीक्षेला जाताना आपल्या आई-वडिलांना नमस्कार करतो त्याला मिळालेल्या त्यांच्या आशीर्वादामुळे त्याला एक दिलासा मिळतो मनावरचा ताण थोडा तरी कमी होतो त्याला परीक्षेत चांगले यश मिळते अर्थात या यशामागे त्याचा अभ्यास असतो त्याने सातत्याने केलेले प्रयत्न असतात .

मित्रांनो म्हणूनच आयुष्य सुद्धा ही प्रत्येकाच्या जीवनातील एक सत्व परीक्षाच असते त्यात उत्तम रित्या उत्तीर्ण होण्यासाठी त्याने मनात जपलेला श्रद्धाभाव असाच उपयुक्त ठरतो म्हणूनच परमेश्वराने त्याला प्रदान केलेल्या बुद्धीचा वापर आणि मनात जोपासलेल्या भावनेची कदर त्यामुळेच त्या भावनेचा त्याने केलेला आदर हा आपल्याला सुखी समाधानी तृप्त आयुष्य प्राप्त करून देतो हाच आज आपल्या चिंतनाचा विषय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!