ताज्या घडामोडी

महाशिवरात्री निमित्त स्वयंभू महादेव मंदिर येथे पहाटे महा अभिषेक व पुजा करण्यात आली.

तळेगाव दाभाडे येथील स्वयंभू महादेव मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावून घेतले दर्शन.

Spread the love

महाशिवरात्री निमित्त स्वयंभू महादेव मंदिर येथे पहाटे महा अभिषेक व पुजा करण्यात आली.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १८ फेब्रुवारी.

तळेगाव दाभाडे येथील स्वयंभू महादेव मंदिर येथे शिवरात्रीनिमित्त महा अभिषेक करण्यात व विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. मंदिर परिसरात उत्कृष्ट असा मंडप टाकण्यात आला आहे व उत्कृष्ट रांगोळी व सजावट केली आहे. मंदिर परिसरा बाहेर पानं फुलांची दुकाने थाटली आहेत.

पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलेली होती येणाऱ्या भावी भक्तांसाठी बाहेर प्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याने भक्तगण त्याचा लाभ घेत आहेत.

 

स्वयंभू महादेव मंदिर येथे वातावरण निर्मिती झाली आहे. मंदिरातील शिवरात्रीचे नियोजन स्वयंभू महादेव मंदिर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.पाहुयात व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!