ताज्या घडामोडी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता
पुणे : जिल्ह्यात मागील 24 तासात दहा हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असून बैठकीतील निर्णयावर पुणेकरांचे लक्ष आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले होते .परंतु मागील 24 तासात ही संख्या दुप्पट झाल्याने चिंता वाढली आहे.



