माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत रविवारी लौणावळा नगरपरिषदेतर्फे मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन..
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत रविवारी लौणावळा नगरपरिषदेतर्फे मॕरेथाॕन स्पर्धेचे चार गटात आयोजन करण्यात आले आहे. चारही गटात प्रथम तीन येणाऱ्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहे.
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत रविवारी लौणावळा नगरपरिषदेतर्फे मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन..
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ४ जानेवारी.

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत रविवारी लौणावळा नगरपरिषदेतर्फे मॕरेथाॕन स्पर्धेचे चार गटात आयोजन करण्यात आले आहे. चारही गटात प्रथम तीन येणाऱ्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहे.प्रशासकीय आधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी या स्पर्धेबाबत पञकारांना माहिती दिली.तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धेमधे सहभागी होण्याचे आवाहन केले.

पहिला गट ५वी ते ७ वी व ८ वी ते १० वी या दोन्हीही गटांसाठी विद्यार्थांना नगरपरिषद इमारत ते जयचंद चौक , मावळा पुतळा मार्गे रायवूड , ट्राॕईजमाॕल मार्गे खोंडगेवाडी , सिध्दार्थनगरमार्गे लोणावळा शहर पोलिस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद इमारत असा मार्ग आहे.
खुलागट महिलांसाठी गट ३ व खुलागट पुरूषांसाठी गट ४ यांना मार्ग लोणावळा नगरपरिषद इमारत , पोलिस स्टेशनकडून वर्धमान सोसायटी मार्गे कैलासनगर , नौसेना बाग मार्गे सहारापूल मार्गे भुशीगाव ते मराठे पेट्रोल पंप येथून परत याच मार्गाने लोणावळा नगरपरिषद इमारत हा महिलांसाठी मार्ग आहे.

तर खुलागट पुरूषांसाठी पोलिसस्टेशन , वर्धमान सोसायटी , नौसेनाबाग , सहारा पूल भुशीगाव मराठे पेट्रोल पंप पुढे रामनगर जय मल्हार हाॕटेल काॕर्नर येथून परत याच रूटने लोणावळा नगरपरिषद इमारत आसा आहे.
यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना कॕप , टी शर्ट आणि प्रशस्तिपञके दिली जाणार आहे. या मॕरेथाॕन स्पर्धेसाठी शाळांमधील विद्यार्थ्याच्यावतीने सहभाग घेण्याचे प्रशासकीय आधिकारी यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे.



