ताज्या घडामोडी
डाॅ.पं.नंदकिशोर कपोते महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित..
भारत सरकार चा मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविन्द्र नाट्य मंदिर, मुंबई येथे गौरव करण्यात आला.
डाॅ.पं.नंदकिशोर कपोते महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित..
आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ३ जानेवारी.


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविन्द्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, मानपत्र व रूपये एक लाख देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मुंबई चे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे हे मान्यवर उपस्थित होते.



