ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे कुनेगाव लोणावळा येथील आदिवासी पाड्यातील कातकरी समाजातील मुलीचा लग्न सोहळा संपन्न..

या वेळी वधू आणि वर यांच्या भावी आयुष्यात संसारासाठी लागणाऱ्या सर्व गृहउपयोगी वस्तू कन्यादान स्वरूपात भेट..

Spread the love

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे कुनेगाव लोणावळा येथील आदिवासी पाड्यातील कातकरी समाजातील मुलीचा लग्न सोहळा संपन्न.

आवाज न्यूज ; लोणावळा प्रतिनिधी, १ फेब्रुवारी.

मंगळवार दिनांक ३१जानेवारी रोजी “लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड” तर्फे कुनेगाव लोणावळा येथील आदिवासी पाड्यातील एका कातकरी समाजातील मुलीचा लग्न सोहळा संपन्न झाला या वेळी वधूवरांच्या भावी आयुष्यात संसारासाठी लागणाऱ्या सर्व गृहउपयोगी वस्तू कन्यादान स्वरूपात भेट म्हणून देण्यात आल्या.

या कन्यादानात क्लब च्या वतीने रुखवतात
स्टीलची भांडी, ५ ताटे (प्लेट्स), ५ ग्लासेस,५तांबे,५कप, ५वाट्या, विविध प्रकारचे चमचे, तवा, पोलपट बेलन, भिंतीवरचे घड्याळ, बेडशीट,उशी, बादली, मग, झाडू, सुपडी,मसाला बॉक्स चटाई, नवरी मुलीच्या आईला साडी चोळी, नवरी मुलीच्या वडिलांना पॅन्ट शर्ट तसेच लग्न विवाह सोहळया साठी आलेल्या ब्राम्हण तात्या ची दक्षिणा कन्यादान स्वरूपात देण्यात आले तसेच लोणावळ्यातील समाज सेविका सौ.स्वातीताई वर्तक यांनी मुलीसाठी २साड्या, काचेच्या कपाचा सेट तसेच इतर वस्तू अंदन म्हणून दिल्या.

या कन्यादान सोहळ्याला लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन अनंता ( अनिल ) गायकवाड,सचिव लायन अनंता पाडाळे,खजिनदार लायन तस्नीम थासरावाला,प्रकल्प प्रभारी लायन सुनीता गायकवाड, लायन शारदा गायकवाड,लायन रेखा पाडाळे तसेच लोणावळ्यातील सामाजिक संस्थेच्या . श्रिया राहाळकर.दिपाली वाकडकर,  वैशाली दळवी, उद्योजक.रामदास शेलार, कुणे गावचे पोलीस पाटील. गणपती गोजे उपस्थित होते हा सामाजिक बांधिलकीतून संपन्न झालेला विवाह सोहळा तेथील समस्त आदिवासी पाड्यातील लोकांसाठी हा आनंदाचा क्षण होता.

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड चा हा मदतीचा हात म्हणजे सामाजिक आणि गरजू बांधवांना आपुलकीची साथ.

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे  अध्यक्ष. लायन अनिल गायकवाड, सचिव. लायन अनंता पाडाळे,खजिनदार. तस्नीम थासरावाला यांनी नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!