ताज्या घडामोडी

हजरत गौस पाक बाबांचा उत्सव खडकी येथे मोठ्या उत्साहात साजरा.

हजारो भक्तांनी घेतला दर्शन व प्रसादाचा लाभ.

Spread the love

हजरत गौस पाक बाबांचा उत्सव खडकी येथे मोठ्या उत्साहात साजरा.

हजारो भक्तांनी घेतला दर्शन व प्रसादाचा लाभ.

 

आवाज न्यूज  : श्रेयश परदेशी, वार्ताहर पुणे प्रतिनिधी, ३० जानेवारी.

दोन दिवसाचा  हजरत गौस पाक बाबांचा उत्सव खडकी येथे मोठ्या आनंदामध्ये संपन्न झाला, पुणे जिल्ह्यातील, हजारो नागरिक बंधू भगिनींनी दर्शनासाठी गर्दी केली होती या उत्सवात २८ जानेवारी रोजी संदल काढण्यात आला होता. संदलच्या दिवशी ढोलीबाजा वाजवत  फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणात आतिश बाजीत  कार्यक्रम पार पडला.

२९ जानेवारी रोजी, ऊरुसाच्या दुसऱ्या दिवशी देखील दर्शन व भंडाऱ्याचा  उपस्थित भाविक भक्तांनी लाभ घेतला.

 कार्यक्रमाचे नियोजन  हजरत गौस पाक बाबा उत्सव समितीने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!