ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ तळेगाव आयोजित ” लायन्स जिम श्री २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा ” तळेगाव येथील लायन्स क्लबच्या प्रांगणात पार पडली.

दिमाखदार झालेल्या या सोहळ्यात सुरुवातीला कराटेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Spread the love

लायन्स क्लब ऑफ तळेगाव आयोजित ” लायन्स जिम श्री २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा ” तळेगाव येथील लायन्स क्लबच्या प्रांगणात पार पडली.

दिमाखदार झालेल्या या सोहळ्यात सुरुवातीला कराटेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २८  जानेवारी.

दिमाखदार झालेल्या या सोहळ्यात सुरुवातीला कराटेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर लायन हेल्थ क्लब चे चेअरमन लायन मनोहर दाभाडे यांनी उपस्थित चे स्वागत केले.त्यानंतर लायन सेक्रेटरी राजेंद्र झोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी व्यायामाची गरज असते व “आरोग्यम् धनसंपदा “हेच ब्रीदवाक्य मनात ठेवून लायन्स हेल्थ क्लबचे १९९६ पासून निरोगी मावळ व सशक्त मावळ घडवण्याचे कार्य ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालू आहे त्याचा आम्हा सर्व लायन सभासदांना अभिमान आहे असे सांगितले.

त्यानंतर उपस्थितीचा नामोल्लेख करताना ,पोषणमूल्य आहाराचे मावळमध्ये वाटप करणारे हेल्थ क्लब चेअरमन लायन मनोहर दाभाडे, आदरणीय प्रांतपाल व मार्गदर्शक दीपक भाई शहा, लायन चंद्रकांत थिटे लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन मयूर राजगुरूव खजिनदार सचिन शाह ,लायन क्रीडा समितीचे अध्यक्ष लायन्स सुरेश जाधव यांचा उल्लेख केला.लायन चंद्रकांत थिटे यांनी लायन्स हेल्थ क्लब उभारणीत लायन शैलेश शहा यांचा सिंहाचा वाटा आहे असे नमूद केले व हेल्थ क्लब संदर्भात माहिती दिली .

शरीर सौष्ठव स्पर्धा पाच वजन गटात घेण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे .
“मानाचा समजला जाणारा लायन्स तळेगाव जिम श्री २०२३ हा किताब मॉन्टी खांडभोर यांना मिळाला .”
बेस्ट पोझर म्हणून” रिषभ गोपणे “व बेस्ट इम्पवहुर अमरीक कोहर यांना किताब मिळाला.

५५ किलो वजन गट
प्रथम क्रमांक :अमरीक कोहर, द्वितीय क्रमांक :साई निलजकर
तृतीय क्रमांक :सुनील निसार उत्तेजनार्थ :अथर्व भेगडे
५५ ते ६० वजन गट
प्रथम क्रमांक: गोमेश पायंग
द्वितीय क्रमांक :रिषभ गोपणे
तृतीय क्रमांक :अथर्व दाभाडे उत्तेजनार्थ :हर्ष सपुकेर
६० ते ६५ वजन गट
प्रथम क्रमांक :मॉन्टी खांडभोर द्वितीय क्रमांक: यश लखम
तृतीय क्रमांक :क्रिष कुमार उत्तेजनार्थ: रोहन बामहांडे
६५ ते ७० वजन गट
प्रथम क्रमांक :सादाप शेख
द्वितीय क्रमांक :रितेश दिवाण
तृतीय क्रमांक: शंतनु शिंदे
उत्तेजनार्थ : विजय केवट
७० ते ७५ वजन गट
प्रथम क्रमांक :शिवम मुंजाळ
द्वितीय क्रमांक: जगदीश इंगोले तृतीय क्रमांकः क्रषिकेश सुतार.

‘ गरीब व गरजू खेळाडूंना ‘लायन्स हेल्थ क्लब तर्फे मोफत व्यायाम करण्यासाठी सुट देण्यात आली

स्पर्धेचे सूत्रसंचालन लायन्स सुरेश जाधव यांनी केले
सहा वेळा “मावळ श्री किताब मिळवणारे  दिलीप राजवाडे “यांनी शरीरसौष्ठव ची सुंदर अशी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थिताची मने जिंकली.

स्पर्धा पार पाडण्यासाठी जिम प्रशिक्षक दत्ता तनपुरे, निहाल परदेशी ,भिसे सर व पारगे यांनी जबाबदारी पार पाडली
लायन शेखर चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले उपस्थितांमध्ये लायन अनिल तानकर लायन किरण किल्ल्लावाला ,लायन सुनिल वाळुंज, लायन सुनील जैन लायन नंदकुमार हरगापुरे, श्री मंगेश दाभाडे, सोमनाथ शिंदे, निशांत काळोखे व उदय भेगडे व तळेगाव मधील नागरिक ,व्यायाम प्रेमी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!