ताज्या घडामोडी

पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण समारंभ उत्साहात संपन्न

पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे आज महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला

Spread the love

पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण समारंभ उत्साहात संपन्न.

पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे आज महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ जानेवारी.

यावेळी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील  शेळके,पवना असोसिएशनचे चेअरमन पद्मभूषण रज्जू श्रॉफ, सेन्ड्रा श्रॉफ, पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष . संतोषजी खांडगे साहेब व पवना पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे पालक सदस्य .सुनील नाना भोंगाडे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, वनविभागाचे अधिकारी राहुल पाटील,पवना असोसिएशनचे मॅनेजर रोहित श्रीवास्तव,व्हाईस चेअरमन जिजर खुराकीवाला, सेक्रेटरी सुमित चोक्सी,प्रदिप सागर, शिल्पा सागर, यांच्यासह परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय विद्यार्थी हेच भावी पिढीचे भवितव्य आहे शाळेतुन संस्कारक्षम पिढी घडावी देशाचे नेतृत्व करण्याचे बाळकडू शिक्षणात आहे तसेच पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत असे मत पवनानगर शालेय वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी मराडे व सुवर्णा काळडोके यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे साहेब,शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर, पर्यवेक्षिका निला केसकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!