ताज्या घडामोडी

मंगळवारा, पुण्यातील जुन्या बाजारातील दुकानांना भीषण आग..

Spread the love

मंगळवारा, पुण्यातील जुन्या बाजारातील दुकानांना भीषण आग.

 

आवाज न्यूज :  पुणे प्रतिनिधी, १८ जानेवारी.

पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या  गाड्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र नेमकी आग कशामुळे लागली होती याची माहिती अद्याप समजलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील ७ ते ८ दुकानांना आज सकाळी आग लागली आहे. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!