ताज्या घडामोडी

मावळ मधील टाटा पॉवर च्या अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या जागेबाबत मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार. श्रीरंग आप्पा बारणे यांचे निवेदन..

जा.क्र. थेरगांव/पुणे/ ००९६/२०२३ मुख्य कार्यकारी अधिकारी. आयुष प्रसाद जिल्हा परिषद पुणे.

Spread the love

मावळ मधील टाटा पॉवर च्या अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या जागेबाबत मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १७ जानेवारी.

मावळ मधील टाटा पॉवर च्या अनेक वर्षाच्या प्रलंबीत जागे बाबत मावळ मतदारसंघा मधील मावळ विधानसभेतील टाटा धरण भागात ज्या गावात अंत्यविधी किंवा इतर धार्मिक विधी टाटा च्या जागेत होत आहे त व अंदर मावळ मध्ये आदिवासी जनतेला हॉस्पिटल च्या सुविधा मिळाव्यात, तसेच जनावरांच्या  आजारावर उपचारासाठी हॉस्पिटल व्हावे, यासाठी वडेश्वर ग्रामपंचायत हद्दीत टाटा पॉवर ने तेथील ग्रामपंचायती च्या मागणी नुसार जागा व इतर धरण भागातील जागे बाबत टाटा पॉवर ने जागा द्यायचे  ठरवले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार  मुळशी च्या धरती वर सदर ची जागा  देण्यास तयार असून आपल्या काही अटी आणि शर्ती मुळे सदर च्या जागे बाबत विलंब होत आहे तरी या बाबत टाटा पॉवर चे अधिकारी, पंचायत समिती चे खात्यातील अधिकारी व ज्या भागात ग्रामपंचायतीला जागा हवी आहे अश्या सर्वानी  समन्वय साधून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा.

व त्याबाबतची सर्व माहिती मला द्यावी असे निवेदन  मावळ लोकसभेचे .खासदार.श्रीरंग आप्पा बारणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी. आयुष प्रसाद जिल्हा परिषद पुणे यांना दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!