ताज्या घडामोडी

आयआरबी ऑफिस ला शिवसेना वाहतूक शिवसेनेतर्फे त्याच्या टोल वसुली करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बाबत पत्रक देऊन इशारा देण्यात आला.

आयआरबी प्रशासन दृतगती महामार्ग प्रवासादरम्यान टोल आकारत असेल तर त्या बदल्यात सुविधा देणे बंधनकारक आहे असे मत शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख.. हेमंत मेने..

Spread the love

आयआरबी ऑफिस ला शिवसेना वाहतूक शिवसेनेतर्फे त्याच्या टोल वसुली करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बाबत पत्रक देऊन इशारा देण्यात आला.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ११ जानेवारी.

अपघाताच्या वेळी प्रवाश्याना जी आपत्कालीन फस्ट एड ट्रीटमेंट देण्यासाठी उभरण्यात आलेले ट्रॉमा केयर सेंटर सुस्थितीत नसल्याने विचारणा केली तसेच आपले वाहन दृतगती महामार्गांवर बंद पडले असता किंवा वाहनाला अपघात होऊन बंद पडले असता आय आर बी तर्फे टो व्हॅन तसेंच ऍम्ब्युलन्स ह्या सेवा आय आर बी ने देने बंधनकारक आहेत.तरी सुद्धा प्रायव्हेट टो व्हॅन व ॲम्ब्युलन्स प्रवाश्यांची जास्तीचे पॆसे आकारून प्रवाश्यांची लूटमार करत असतात.

तसेच खोपोली कडून लोणावळ्याला चुकीच्या पद्धतीने अवजड वाहने महामार्ग पोलिसांच्या वरद हस्ता मुळे बिनधास्त वरती येत असतात ती वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी असा सज्जड दम शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने आय आर बी प्रशासनाला देण्यात आला .

असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले जर आयरबी प्रशासन दृतगती महामार्ग प्रवासादरम्यान टोल आकारत असेल तर त्या बदल्यात सुविधा देणे बंधनकारक आहे असे मत शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत मेने व नरेश काळवीट शिवसेना अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक यांनी व्यक्त केले .तसेच ट्रॉमा केयर सेंटर मध्ये होणाऱ्या गैरसोयीमुळे जर कोणाही प्रवाश्याला आपला जीव गमवावा लागला तर याची पूर्ण जबाबदारी आय आर बी प्रशासनाची असेल असे मत शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख अभिजित गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच या बाबत योग्य ती पाउले लवकरात लवकर उचलण्यात आली नाही तर, आय आर बी च्या कुठल्याही अधिकाऱ्याला ऑफिस मध्ये येऊन देणार नाही असा धमकी वजा इशारा देण्यात आला.

यावेळी शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक नरेश काळवीट, जिल्हा सचिव योगेश गिरीगोसावी,जिल्हा उपसचिव जावेद पठाण, महेश फाटक तालुका संघटक रवी इंगळे, पराग राणे, युवराज, अक्षय देसाई धनेश हुंडारे काशिनाथ येवले तसेच वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!